नांदेड – इरोड एक्स्प्रेस आणि पूर्णा-तिरुपती एक्स्प्रेसच्या काही फेऱ्या रद्द
नांदेड। नांदेड – इरोड एक्स्प्रेस आणि पूर्णा-तिरुपती एक्स्प्रेसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची प्रवाश्यानी नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे विभागानं केले आहे.
गाडी क्रमांक 07189 नांदेड ते इरोड एक्स्प्रेस दिनांक 29 सप्टेंबर आणि 6 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07190 इरोड ते नांदेड एक्स्प्रेस दिनांक 01 आणि 08 ऑक्टोंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 07609 पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 25 सप्टेंबर, 02 आणि 09 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07610 तिरुपती ते पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 26 सप्टेंबर, 03 आणि 10 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या काही गाड्या पूर्ववत
खानापूर ते हैदराबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी क्रमांक 17648 पूर्णा-हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक 24 सप्टेंबर, 2023 पासून पूर्णा ते हैदराबाद दरम्यान नियमित वेळापत्रक नुसार धावेल.
हैदराबाद ते खानापूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी क्रमांक 17647 हैदराबाद – पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 24 सप्टेंबर, 2023 पासून हैदराबाद ते पूर्णा दरम्यान नियमित वेळापत्रक नुसार धावेल.