नांदेडसोशल वर्क

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांची माहिती होणार अद्यावत

नांदेड| जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना (सर्व शाळा, महाविद्यालय) यांची माहिती अद्यावत करण्यात येत आहे. यात आस्थापनाचे नाव, नोंदणी क्रमांक, अधिकाऱ्यांचे नाव / पदनाम, ईमेल आयडी, पॅन / टॅन क्रमांक, स्थापना वर्षे, दुरध्वनी / मोबाईल क्रमांक, संपर्क पत्ता, कामाचे स्वरूप/ प्रमुख कार्य, अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ही माहिती nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

राज्य शासनाचा पूर्वीचा रोजगार व स्वयंरोजगार व सध्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे असलेल्या सर्व आस्थापनांची नोंद रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात उद्योजक/ नियोक्ते यांचा डेटा एनसीएस पोर्टलवर अपेड करत असतांना उद्योजक / नियोक्ते यांच्या डेटामध्ये उद्योग क्षेत्र, नाव, कामाचे स्वरूप, संस्था पॅन/टॅन, सिटी आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याबाबत ई-मेल अन्वये तांत्रिक तज्ज्ञ www.mahaswayam.in.gov.in महास्वयम वेबपोर्टल यांनी कळविले आहे.

सदर माहिती निरंक असल्याने या उद्योजक / नियोक्ते यांची माहिती एनसीएस पोर्टलवर अपडेट होण्यास अडचण येत आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी याबाबतची माहिती तात्काळ nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठवावी. माहिती अद्यावत करतांना काही अडचन आल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 9975646466 वर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!