
नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या आदेशाने रेकॉर्ड वरील आरोपीतांचा शोध घेवुन चेक करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, यांना दिनांक 21/05/2024 रोजी 13.05 वाजताच्या सुमारास गोपनिय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन इतवारा परिसरात रेकॉर्ड वरील आरोपी नागेश ऊर्फ लड्या व त्याचे दोन साथिदार सोबत फिरत आहेत अशी माहिती मिळाली.
या माहिती प्रमाणे नागेश ऊर्फ लडया व त्याचे दोन साथिदाराना ताब्यात घेऊन त्याना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नागेश ऊर्फ लडया पि. उत्तमराव लडे वय 25 वर्षे व्यवसाय बेकार रा. मेंडला खु. ता. अर्धापुर जि. नांदेड, विशाल मधुकर डोलारकर वय 27 वर्षे व्यवसाय मुजरी रा. लंगडी गल्ली अर्धापुर जि. नांदेड, गणेश मारोती घोरफडे वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. शिवाजी नगर पाटी जवळ मालेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड असे सांगितले. त्याना पोलीस स्टेशन इतवारा येथे आणुन त्याना अधिक विचारपुस केले असता त्यानी व त्याच्या साथिदारानी पोलीस स्टेशन अर्धापुर अर्धापुर व बारड परिसरात गुन्हे केले असे सांगितले. वरील आरोपी व इतर साथिदार कडुन 44 मोबाईल व गुन्हयात वापरलेली तीन मोटार सायकल असा एकुण 10,61,000/- रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
या आरोपींनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण, भाग्यनगर, बारड व गंगाखेड जिल्हा परभणी येथे गुन्हे केलेले असुन पोलीस स्टेशन अर्धापुर गुरन 222/24 कलम 394, 34 भादवि हा याच आरोपींनी केल्याचे निष्पन झाले आहे. व इतर पाच आरोपीनी पोलीस स्टेशन बारड गुरन 40/24 कलम 395, 34 भादवि आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन झाले आहे. सहा आरोपी पोलीस स्टेशन अर्धापुर व पाच पोलीस स्टेशन बारड असे एकुण आकरा आरोपी त्यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अर्धापुर व पोलीस स्टेशन बारड करत आहेत.
सदर कार्यवाही बाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.
