श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। अवैधरीत्या वाळू तस्करी करतांना महसूल पथक व पोलिसांच्या हाती लागलेला एमएच २८ बीए ३३०१ या क्रमांकाचा टीप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला होता. सरकारी ताब्यातला तो टीप्पर चोरून नेल्या प्रकरणी तलाठी चंद्रकांत बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहुर पोलिसांनी दि.२१ जून रोजी रामेश्वर कोंडबाजी मुसळे यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी बाबर यांनी माहुर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत दि.१/१०/२०२३ रोजी रात्री ११ वा. चे सुमारास टाकळी येथील पैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एमएच २८ बीए ३३०१ या क्रमांकाचा टीप्पर माहूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया जवळ पकडला.पोलिसासमक्ष टीप्पर चालक अजय रामराव भगत रा. टाकळी याचेकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला,परंतु त्यांचेकडे तो आढळून आला नाही.

त्यावर टीप्पर कुणाचा असे विचारले असता सुनिल चंद्रभान गायकवाड रा. पडसा यांचा असल्याचे त्याने सांगितले. असा उल्लेख बाबर यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.दि.४ मे २०२४ रोजी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी अवैध वाळू तस्करी प्रकरणी जप्त वाहनांची तपासणी केली, असता सदरचा टीप्पर आढळून आला नाही.त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तो टीप्पर चोरून नेला असून त्याचा शोध घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करा असे तहसीलदार किशोर यादव यांनी आपल्यासह पोलिसांना पत्र दिले.

त्यावरून तपास केला असता दि.१३/५/२०२४ रोजी सायं.६-१८ वा.टाकळी येथील स्मशान भूमी जवळील विजय कोंडबाजी मुसळे यांच्या शेतात सदर टीप्पर दिसून आला.तसेच नंबर वरून सविस्तर चौकशी केली, असता तो टीप्पर रामेश्वर कोंडबाजी मुसळे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे व लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने रीतसर फिर्याद देण्यास वेळ लागल्याचे तलाठी बाबर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. प्रभारी पो. नि.शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे.

वाई बाजार येथील सामाजिक कार्यकर्ता साजिद खान यांनी अर्थपूर्ण संबंधातून तहसील कार्यालयाच्या आवारातून टीप्पर गायब झाल्या संदर्भात आवाज उठविला होता.त्यामुळेच पोलिस कारवाईची औपचारिकता केली गेली अशी सर्वत्र कुजबुज सुरू आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version