
नांदेड| नांदेड येथील ज्येष्ठ विधीज्ञ विजयमाला एस.मनवर यांना ‘बेस्ट लॉयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जपान येथील पू.भंते जुनसई तेरा सावा यांचे हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्वविख्यात कायदेपंडित, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ जुलै १९२३ रोजी त्यांच्या वकिली व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करुन वकिली व्यवसायास मुंबई उच्च न्यायालयात प्रारंभ केला होता, या घटनेस १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने हे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून ‘आल इंडिया एस सी अँड एस टी अडवोकेट्स वेलफेअर ऑर्गनायझेशन न्यू दिल्ली’यांचे मार्फत दी. २५ डिसेंबर २३ रोजी सातकरणी बुद्ध विहार जि. लातूर येथे ६ वी. बौद्ध धम्म परिषद पार पडली यात जपानचे बौद्ध धम्म गुरु भिक्खू जूनसाई तेरा सावा यांच्या हस्ते नांदेड येथील विधीज्ञ विजयमाला मनवर यांना देशपातळीवर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास पू.भिक्खू उपगुप्त महा थेरो, पू. भिक्खू धम्मसेवक जी महाथेरो (मुळावा), पू.भिक्खू पय्यानंद महाथेरो,भिक्खू गण उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री संजय बनसोडे, प्रा.जोगेंद्र कवाडे, खा.सुनील गायकवाड,विधीज्ञ श्री. एस. एम.पुंड.अध्यक्ष बार असोसिएशन नांदेड, विविध जिल्ह्यातून आलेली विधीज्ञ मंडळी, उपासक,उपासिका, नातेवाईक,मित्रमंडळी उपस्थित होते.
