धर्म-अध्यात्मनांदेड

Shivmahapuran katha Pimplgaon ; भव्य शिव महापुराण कथा व श्री 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग व नाम संकीर्तन सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण

अंदाजे दररोज १ ते सव्वा लाख भाविक घेणार कथेचा लाभ, ४०० बाय ७०० भव्य कथा मंडप, १२० बाय १२० लाकडी बांबू चा यज्ञ मंडप, साधू संतासाठी ६० गवताच्या पर्णकुटी, ४ हेक्टर मध्ये महाप्रसाद व्यवस्था, दररोज ४३७ जोडपी यज्ञा साठी सात दिवस बसणार, कॅरी बॅग वापराचा दुष्परिणाम व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुकान बंदीचा ठराव

भोकर, गंगाधर पडवळे। मौजे पिंपळगाव येथे येत्या ६ मार्च पासून भव्य शिव महापुराण कथा तथा श्री १०८ कुंडी विश्वशांती श्री दत्तयाग यज्ञ होणार असून त्याकरिता भव्य सभा मंडप, यज्ञ शाळा, पर्णकुटी साजल्या आहेत तर महाप्रसाद व्यवस्था, पाकशाळा, वाहनतळासह जवळजवळ सर्व व्यवस्था सज्ज आहेत. आयोजक कमिटीच्या अंदाजाने दररोज एक लाख ते सव्वा लाख भाविक येथे येणार असून त्यांच्या साठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी सर्वोतपरी आमचा प्रयत्न राहणार असून येथे दुकान लावण्यास बंदी असल्याचे सांगितलं आहे त्याचं बरोबर हा परिसर कॅरीबॅग मुक्त ठेवण्यात आला आहे.

या कथेचे कथाकर तथा प्रवक्ते अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु द्वाराचार्य श्री अग्रपीठाधीश्वर युवा मलुक पीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्रदास देवाचारीजी महाराज श्री रेवासा वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांच्या श्री मुखातून कथा प्रारंभ गुरुवार दिनांक ६ मार्च 2025 ला होणार असून कथा सांगता गुरुवार दिनांक 13/03/2025 ला होईल या भव्य शिव महापुराण कथेचा वेळ दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असेल. तर सदरील सोहळ्यातील कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल सकाळी ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री परमरस्य ग्रंथ पारायण अनुष्ठान सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ११ते ४ महापूजा रात्री ८ ते १० कीर्तन. शोभायात्रा गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 सकाळी नऊ वाजता दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे हत्ती,उंट,घोडे, ढोलताशे, बँड पथक, भजन, कलश आदिसह निघेल.

श्री 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ याकाळात दररोज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत असेल श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारण सोहळा गोशाळा श्री क्षेत्र पिंपळगाव दिनांक 9 मार्च 2025 सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी संपन्न होईल असेही कळविण्यात आले आहे.
सदरील सप्ताहातील किर्तन, सोहळ्यातील भव्य भजनसंध्या दिनांक ६ मार्च २०२५ वार गुरुवार परमपूज्य राधाकृष्णजी महाराज जोधपुर यांची भव्य भजन संध्या होईल. दिनांक ७ मार्च २०२५ शुक्रवार श्री ष. ब्र.१०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई जिल्हा सातारा, दिनांक ८ मार्च २०२५ शनिवार ह. भ. प.विदर्भरत्न रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर आळंदी दिनांक ९ मार्च २०२५ रविवार ह. भ. प.डॉ. कृष्णा महाराज चौरे पंढरपूर, दिनांक १० मार्च २०२५ सोमवार ह. भ. प. महंत प्रमोद महाराज जगताप बारामती, दिनांक ११ मार्च २०२५ मंगळवार ह. भ. प.एड. जयवंत महाराज बोधले पंढरपूर, दिनांक १२ मार्च २०२५ बुधवार श्री ष. ब्र.१०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, दिनांक १३ मार्च २०२५ गुरूवार आचार्य परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज मघापुरी जिल्हा अकोला यांचे काल्याचे किर्तन राहील.

या सात दिवसातील भव्य शिव महापुराण कथेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा महंत श्री योगी आदित्यनाथ जी यांची विशेष उपस्थिती राहणार असून त्याचबरोबर वपू स्वामी श्री कृष्ण कृष्ण गुरु शरणानंद जी महाराज रेती, पप्पू गीता मनीषा स्वामी श्री ज्ञानानंद जी महाराज वृंदावन व पु श्री परमहंस प्रज्ञा आनंद जी महाराज जगन्नाथ पुरी पपू श्री राम प्रवेश दास जी महाराज वराह घाट वृंदावन पप्पू श्री पुंडलिक गोस्वामी जी महाराज वृंदावन पप्पू श्री प्रणव आनंद सरस्वती जी महाराज वृंदावन पपू गुरु श्री स्वामी श्री दत्त शरणानंद जी महाराज प्रथमेश पपू श्री स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज आयोध्या पप्पू स्वामी श्री सिद्धनानंद सरस्वती परमार्थ निकेतन ऋषिकेश पप्पू श्री कृष्णानंदजी महाराज वृंदावन पंजाब पपू श्री रामेश्वर दयाजी छोटे सरकार मध्य प्रदेश पप्पू स्वामीजी श्री अवधेशैतन्य ब्रह्मचारी जी महाराज सुरज कुंड पप्पू ह भ प श्री भास्करगिरी महाराज देवगड पप्पू स्वामी श्री पुण्यानंदगिरी महाराज हरिद्वार पप्पू श्री दीनबंधू दास जी महाराज वृंदावन परम पूज्य साध्वी कनकेश्वरी देवीजी श्री मोरवी गुजरात पप्पू स्वामी श्री किशोरदास देऊन महाराज वृंदावन पप्पू श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी बागेश्वर धाम पप्पू मामा स्वामी श्री ईश्वर दाजी महाराज हरिद्वार पप्पू श्री राधाकृष्ण जी महाराज जोधपुर पप्पू महामंडलेश्वर राम गोपाल दाजी महाराज इंदोर यांच्यासह देशातील ५०० ते ५०० साधुसंत पिठाधीश्वर, चारधाम येथील संत महंत साधू आदी याठिकाणी येणार असून सर्वांचे दर्शन घेण्याचा दुर्लभ असा लाभ आपणास मिळणार आहे तरी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे आवाहन आयोजक श्री शिव सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य भक्त परिवार व परमपूज्य गोवत्स बालतपस्वी, बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिठाधीश्वर श्री दत्त मंदिर संस्थान पिंपळगाव यांनी केले आहे.

त्याचबरोबर दिनांक ६ मार्च रोजी गुरुवारी रात्री आठ ते दहा परमपूज्य राधाकृष्णजी महाराज जोधपुर यांच्या मधुर आवाजातून भजन संध्या ऐकण्यास मिळणार आहे तर दिनांक ९ मार्च २०२५ रोज रविवार दुपारी ११ वाजता श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड प्रदेश संघटन मंत्री भारतीय किसान संघ यांचे गोमातेवर सुंदर असे प्रवचन होणार आहे.यासह ह. भ.प.माधव महाराज बोरगडकर यांचे प्रवचन दिनांक १२ मार्च २०२५ ला बुधवार सकाळी ११ ते १२ यावेळेत ठेवण्यात आले आहे परमहंस परिवज्रकाचार्य समर्थ सद्गुरु श्री मूर्ती श्री श्री १००८ महंत बाबासाहेब मधुसूदन भारती जी महाराज श्री दत्त शिखर माहूरगड यांच्या कृपा आशीर्वाद राहणार आहे.

सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व डिपार्मेंट च्या जिल्हा प्रमुख अधिकाऱ्यांना येथील स्थानिक खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर,माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आदींनी प्रत्येक्ष कार्यक्रम स्थळाची अनेकदा पाहणी करून कमतरता असणाऱ्या बाबींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज दि. २ मार्च रोजी आमदार कोहळीकर यांनी येथे हदगांव उप विभागाचे उपविभाग अधिकारी अविनाश कांबळे व अन्य अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन आवश्यक ते सूचना दिल्या असून जिल्हा प्रशासन देखील या साठी सज्ज असून कार्यक्रम अगदी भव्य दिव्य होण्यासाठी वरील पदाधिकाऱ्यांनी स्वतः हुन सात दिवस तळ ठोकून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी कुठलीच कमतरता पडू देणार नसल्याचे आमदार कोहळीकर यांनी या वेळी बोलून दाखविले.

लाखो भाविक भक्त दररोज महाप्रसाद जरी घेणार असले तरी त्यासाठी स्टील चे ताट व ग्लास चाच वापर होणार असल्यामुळे कॅरीबॅग मुक्त हा कार्यक्रम होणार आहे. जर का येथे दुकान लावण्यात आले तर कॅरी बॅग चा सर्रास वापर होतो व प्लस्टिक पत्रावळी द्रोण ग्लास वापरले तर त्याचा परिणाम पुढील कित्येक दिवस,वर्ष येथील शेतीवर अवलंबून असनाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गुरे, ढोरे, शेती वर देखील होईल त्यामुळे पंचक्रोशीतील सर्वच गावांनी ग्रामपंचायत चा ठराव देऊन होणाऱ्या दुष्परिणाम, व वाहतूक कोंडी थांबावी म्हूणन या कार्यक्रमात दुकान बंदी करून यासाठी मदत केली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!