हिमायतनगर। कारला पिचोंडी गावच्या विकासासाठी आजपर्यंत निधी उपलब्ध करून दिला असुन दोन्ही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असुन राहिलेल्या गावातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून कामे करणार असून या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले.
पिचोंडी येथे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नामुळे जलजिवन योजनेला मंजुरी मिळाली असुन त्यामुळे नागरीकांना घरोघरी नळ देऊन पाणी मिळणार आहे. त्या अंतर्गत पाण्याचा टाकीच्या बांधकामाला सुरूवात होणार असून या कामाचे उदघाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच गजानन कदम, प्रमुख पाहुणे कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक शेख रफिकभाई, पाणी पुरवठा उपअभियंता एस. एम. हिरप, निखिल कोमलवार, गूत्तेदार पवार, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, उपसरपंच रोशन धनवे, पोलीस पाटील कैलास डुडुळे,ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, बाबाराव डवरे,रामजी मिराशे, गजानन मिराशे, अ.रज्जाकभाई ,दत्ता चिंतलवाड, तुकाराम कदम, यांची उपस्थिती होती.
या उदघाटन प्रसंगी बोलताना आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की कारला पिचोंडी गावच्या जनतेचे जवळगावकर परिवारावर प्रेम ,विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणामुळे विकास थांबला असला तरी येणाऱ्या काळात दोन्ही गावातील मुख्य रस्त्याची कामे पूर्ण करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आ.जवळगावकर यांनी बोलतांना सांगितले आहे. या कार्यक्रमाला पिचोंडी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ गफार यांनी केले तर आभार सोपान बोंपीलवार यांनी मानले.