नांदेड। राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. ते काल नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला त्या प्रकरणी भेट देऊन उपाययोजना संदर्भाने येत असल्याचे समजते.
मंगळवार 3 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 3 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.45.ते 4.15 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट व दुर्घटना परिस्थितीबाबत आढावा बैठक. दुपारी 4.15 वा. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पत्रकार परिषद. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून चारचाकी वाहनाने विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6 वा. खाजगी विमानाने विमानतळ नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण.