नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्‍ती धोके न्‍युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्‍न

नांदेड| संयुक्त राष्‍ट्र संघाने आपत्‍ती धोके कमी करण्‍यासाठी लोकांमध्‍ये जागृती करण्‍याच्‍या दृष्‍टीने 13 ऑक्‍टोंबर हा जागतिक आपत्‍ती न्युनिकरण दिन घोषित केला आहे. दिनांक 8 सप्‍टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातही दरवर्षी सर्व जिल्ह्यामध्ये 13 ऑक्‍टोंबर हा दिवस आपत्‍ती धोके निवारण दिवस म्‍हणून साजरा करण्यात येतो. राष्‍ट्रीय आपत्‍ती प्राधिकरण नवी दिल्ली एनडीएमए यांनी आपत्‍ती प्रतिसादासाठी कटिबध्‍द होण्‍यासंदर्भात प्रतिज्ञा दिलेली आहे. या प्रतिज्ञेचे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वा. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामुहिक ग्रहण केले.

जिल्हा आपत्‍ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजीत आग या आपत्‍ती सदंर्भात महानगरपालिका नांदेडच्‍या अग्नीशमन दलामार्फत रंगीत तालीम व प्रात्‍याक्षीके सादर करण्‍यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्‍याबाबत माहिती देण्‍यात आली. तसेच हाय बिल्‍डींग रेस्‍क्युचे प्रात्‍यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिक पत्रकार यांच्‍या हस्‍ते प्रत्‍यक्ष अग्नीरोधक उपकरण Fire Extinguisher कशा प्रकारे हाताळावेत याबाबत प्रात्‍याक्षीकही देण्‍यात आले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या संकल्‍पनेतून अपर जिल्हाधिकारी एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी सामान्‍य संदीप कुलकर्णी, तहसिलदार विजय अवधाने, रामदास कोलगणे, शंकर लाड, अग्नीशमन अधिकारी केरोजी दासरे व अग्नीशमनदलाचे कर्मचारी, जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे, कोमल नागरगोजे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!