नांदेड| शहर परिसरात दोन्ही हातात तलवार घेऊन दहशत पसरवित पाठीमागे धावला. यामुळे घाबरलेल्या एकाच मृत्यू झाल्यामुळे पोलिस सदरील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र आरोपीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीच्या पायाला गोळी लागल्यानं त्याचेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील शेरुसिंह नानकसीह गील वय 40 वर्ष आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून, दि.18 रोजी, राज्जू सिंह गुलाब सिंह पाठी यांचे पाठीमागे तलवार घेवून धावला होता. यामुळे त्यांना घबरल्याने अटॅक आला व त्यांचा यात मृत्यू झाला. आरोपी ज्या भागात दोन्ही हातात धारदार तलवार व खंजीर घेवून दहशतकरू लागला होता. याची माहिती मिळत पोलीस ताफ्यासह त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो असता त्याने घरातून घरगूती गॅस सोडून पोलीस व इतर मदत करणारे लोक यांचे वर तलवार व दुसऱ्या हातात खंजर घेवून हल्ला करून जीवे मारतो असे म्हणून अंगावर धावून येत हल्ला कारंज्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याला काबू करून ताब्यात घेण्यासाठी तसेच परिसरात गॅस स्फोट होवून जीवित व मालमत्ता हानी टाळण्यासाठी व स्वसंरक्षणार्थ त्याचेवर शासकीय पिस्तूल मधून गोळीबार करण्यात आला. त्यात तो जखमी झालेला असून, डाव्या मांडीवर तीन जखमा झालेल्या आहेत. जखमी गुन्हेगार यास शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे भरती केलेले असून डॉक्टरनी याची प्रकृती स्थिर सल्याचे कळविले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी sdpo श्री सूरज गुरव, लोकल क्राईम बरंच टीमचे api श्री माने psi सोनवणे, rcp महिला पथक मदतीसाठी दाखल झाले होते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून, सध्या घटना घडलेल्या हद्दीत शांतता आहे.