
नवीन नांदेडl महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तरचे अध्यक्ष अशोक केरकर, सचिव जयवंत सोमवाड, सौ भागीरथी बच्चेवार.सौ.
सुनिता तेरकर ,भाऊराव मोरे व ईतर पदाधिकारी सदस्यांनी नायगाव येथे नवनिर्वाचित खा. वसंतराव चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा केली.
या वेळी खा. महोदयाने प्रत्येक मागणीवर विशेष लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वेमध्ये सवलतीच्या संबंधाने तसेच ज्येष्ठ नागरिकांना मासिक मानधन मिळवून दिनेश च्या बाबतीत स्वतः पुढाकार घेऊन पुढाकार संबंधित मागण्या पूर्ण करण्याचें आश्वासन या वेळी खा.वसंतराव चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. व सर्व ज्येष्ठ नागरिकांची अस्थेवा यिकपणे चौकशी करून विचारपूस केली.
