उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ता.लोहा येथील समाज उन्नती शिक्षण संस्था संचलित संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोहा येथे तालुकास्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.
यश संपादन करणाऱे विद्यार्थी रुपाली वाघमारे खेळाचा प्रकार थाळीफेक प्रथम क्रमांक, प्रशिक कांबळे खेळाचा प्रकार थाळीफेक प्रथम क्रमांक, संगमेश्वर भोकरे खेळाचा प्रकार ४०० मीटर हरडल्स प्रथम क्रमांक, अंकिता सिद्धार्थ सोनसळे खेळाचा प्रकार २०० मीटर रनिंग दुसरा क्रमांक, कृष्णा मिसे खेळाचा प्रकार १०० मीटर रनिंग दुसरा क्रमांक, संगमेश्वर भोकरे खेळाचा प्रकार ४०० मीटर रनिंग तृतीय क्रमांक, खुशी कच्छवे खेळाचा प्रकार १०० मीटर रनिंग तृतीय क्रमांक,प्रशिक कांबळे खेळाचा प्रकार गोळाफेक तृतीय क्रमांक या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.
विद्यार्थी खेळाडूंचे व या स्पर्धेसाठी परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षक प्रा भुयारे सर, प्रा. भालेराव सर, अनिल कदम सर, प्रा मुंडे सर यांचे समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड व मुख्याध्यापक आदरणीय श्री मामडे एस. एन. यांनी तसेच प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थीनी या सर्वांच्या वतीने विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच परीसरातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावातील नागरिकांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.