नांदेड| लोकविकास समन्वय संघर्ष समितीने केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नाने तसेच त्यांनी योग्य पर्याय सूचित केल्याने नांवाशमनपाचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून नांदेड शहरातील पाणी पट्टीत कपात केल्याचे दि.२५ जानेवारी रोजी जाहीर केले आहे.कारण हे प्रकरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास देखील समितीने आणून दिले होते. पाणी पट्टीत कपात करावी या मागणीसाठी शहरातील इतरही सामाजिक संघटना आग्रही होत्या.
लोकविकास समन्वय संघर्ष समिती च्या वतीने कोरोना नंतर म्हणजेच पाच वर्षाच्या काळात एकाच वेळी केलेली पाणी पट्टीतील भरमसाठ वाढ ही नांदेडकरांना परवडणारी नव्हती.ती वाढ कमी करा तसेच दारिद्र्य रेषेखालील जनतेसही १००% वाढ केलेली आहे ती ५० टक्क्यांनी कमी करा आदी मागण्या आम्ही केल्या होत्या.मनपामध्ये २७ जुलै,१९ आक्टोबर,१७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर २०२३ रोजी बैठका आयुक्तांनी घेऊन विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्या सोबत चर्चा केली होती.
तेव्हा त्यांच्या निदर्शनास आम्ही पाणी पट्टीत कशी कपात करता येईल यासाठी काही पर्याय सुचविले होते.जे त्यांनी तत्वता मान्य केले आणि प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर तसे आयुक्तांनी जाहीर केले हे महत्वाचे आहे. पाणी पट्टीत केलेली कपात ही पूर्णतः समाधानकारक नसली तरीही काही ना काही प्रमाणात जनतेस या द्वारे दिलासा मिळाला असून दारिद्र्य रेषेखालील जनतेचे बिल हे ५० % कमी झाले आहे.तसेच ज्यांनी अगोदर पाणी पट्टी भरली ती पुढील बिलात कमी करण्याचा निर्णय ही महापालिकेने घेतला आहे आणि तो स्वागतार्ह आहे -कॉ.विजय गाभने, लोकविकास समन्वय संघर्ष समितीचे मुख्यप्रवर्तक
नांदेड शहरामध्ये विकास कामे झपाट्याने सुरु आहेत परंतु गोरगरीब माणूस समाधानी नाही,त्याचे कारण म्हणजे महापालिकेतील विविध घोटाळ्याच्या विभागीय चौकशीसाठी अनेक महिन्यापासुन आंदोलने सुरु आहेत. शहरातील पाणी पट्टी कपात करावी या मागण्यासाठी आग्रही असलेल्या संघटणांनी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला असून मनपा आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीस कॉ.विजय गाभने,कॉ.के.के. जांबकर,सोपानराव मारकवाड, ऍड धोंडिबा पवार,कॉ प्रदीप नागापूरकर,कॉ.उज्वला पडलवार,कॉ. गंगाधर गायकवाड,बंडोपंत कुंटूरकर,उत्तमराव कल्याणकर,जगन पांचाळ, प्रा.लक्ष्मण शिंदे,शंकर कुबडे,डॉ.पुष्पा कोकीळ,कॉ.दिगंबर घायाळे,दिपक आडगावकर,दिपक कासवे,प्रा.रमाकांत जोशी आणि रियाजभाई आदींची उपस्थिती होती.