नवीन नांदेड| श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रि व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे माजी विद्यार्थी संघटना (एस. जी. जी. एस. अलुमनी असोशियेशन) तर्फे दिनांक २३ व २४ डिसेंबर २००२३ रोजी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वर्षी सन १९९८-९९ या वर्षी संस्थेतून पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे “सिल्वर जुबली” वर्ष होते.
सदर मेळाव्यास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देश विदेशातील संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विभागीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून येणाऱ्या काळातील संधी बाबत मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सांस्कर्तिक कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाच्या समन्विका डॉ.आरती मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री महेश मोरोणी (उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक महाराष्ट्र मेट्रो रेल) उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे चेअरमन (नियामक मंडळाचे अध्यक्ष) सुनील रायठ्ठठा यांनी भूषविले त्यांनी महाविद्यालय जीवनातील आठवणी सांगितल्या,संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
अल्युमिनी असोशियेशनचे सचिव महेद्र देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी विविध प्रकारे मदत करावी व संस्थेच्या विकासात हातभार लावावा. पुढे ते म्हनाले की, पूर्वीच्या काळी कमी फॅसिलिटीज (सुविधा) होत्या त्या काळामध्ये सुद्धा मुले शिकून चांगल्या पद्धतीने पुढे आली. सध्या विविध प्रकारच्या फॅसिलिटीज (सुविधा) तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य सुखकर करावे व समाजासाठी योगदान द्यावे.ब्रँच (विद्या शाखा) कोणतीही असेल तरीही त्याबद्दल काहीही मतभेद नसावे, आज कोणत्याही ब्रँचचा विद्यार्थी दुसऱ्या ब्रँच मध्ये करिअर करू शकतो.
आज मल्टी डिसिप्लिनरी युग आहे. प्रत्येक क्षेत्राची प्रत्येकाला थोडी का होईना माहिती असली पाहिजे अन तशी असेल तरच तुम्ही या जगात टिकु शकता. तुम्ही चार वर्षात भरपूर विषय शिकता परंतु प्रत्येक परिस्थितीला तोंड कसे द्यावे हे या परिसरामध्ये तुम्हाला शिकावयाचे आहे.नवनवीन विषय शिकण्याची जिज्ञासा आणि आपला एटीट्यूड (स्वभाव) या दोन गोष्टी पुढे जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतील. आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. माधव वैद्य यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेतील अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.