हिमायतनगर, परमेश्वर काळे| हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर हिमायतनगर कंसात वाढोणा म्हणजे “हिमायतनगर (वाढोणा)” असे नाव लिहीण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी के नागभूषण यांच्या माध्यमातून केली आहे.

हिमायतनगर शहराचे पुरातन कालीन नाव हे वाढोणा, वारणावती आहे. मात्र निजामाच्या काळात या भागातही शेतसारा वसूल करण्यासाठी येणारा हैद्राबाद येथील हिमयतअली राजाला खुश करण्यासाठी शहराचे नाव हिमायतनगर ठेवण्यात आले असल्याचे जुन्या काळातील नागरिक सांगतात. त्यामुळे हिमायतनगर शहराची ओळख जुन्या जाणकारांच्या मते वाढोणा म्हणून आहे. हि ओळख कायम स्मरणात राहावी यासाठी वाढोणा हे नाव सर्वाना लक्षात राहण्याजोगे आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ किसनराव हेंद्रे यांनी रेल्वे अधिकारी के. नागभूषण यांना निवेदन देऊन हिमायतनगर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि शहराचे ऐतिहासिक महत्व अबाधित राहण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर हिमायतनगर शहराबरोबर कंसात वाढोणा म्हणजे “हिमायतनगर (वाढोणा)” असे नाव लिहावे जेणेकरून हिमायतनगर येथील शहराची इतिहासकालीन ओळख शाबूत राहील.

हिमायतनगर शहरात दिनांक २६ रोजी रेल्वे विभागाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत रेल्वे स्टेशन योजनेच्या माध्यमातून कायापालट करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपयाच्या निधीतून पुनर्विकास कामाचा शुभारंभ केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ किसनराव हेंद्रे यांनी हि मागणी केली. या निवेदनाच्या प्रति त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार हेमंतभाऊ पाटील, खासदार अजित गोपछडे आदींसं संबंधितांकडे पाठविले आहे. याप्रसंगी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरसेठ श्रिश्रीमाळ, प्रतिष्ठीत व्यापारी गौतमसेठ पिंचा, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, नांदेड जिल्हा वैद्यकिय आघाडीचे प्रसाद डोंगरगावकर, भाजपाचे सरचिटणिस गजानन तुप्तेवार, भाजपाचे सरचिटणिस आशिष सकवान, भाजपा ता. अध्यक्ष गजानन चायल, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा कडुन ज्ञानेश्वर आधुडे, भाजपा युवा मोर्चा मा. ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, शहर प्रमुख गजानन हरडपकर, चेयरमन गणेशराव शिंदे, लक्ष्मण डांगे, दुर्गेश मंडोजवार, यांचेसह शहरातील नागरीक, पत्रकार, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version