नांदेड| महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 20 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे नांदेड केंद्रावरील उद्घाटन बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी जेष्ठ रंगकर्मी गोविंद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे, आ. भा. म. नाट्य परिषद, नांदेडचे अध्यक्षा सौ. अपर्णा नेरलकर, साहित्यिक, पत्रकार भारत दाढेल परीक्षक भारत जगताप, शंकर घोरपडे, दो. स्वाती वेदक यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने आणि नटराज पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले या प्रसंगी रंगकर्मी, प्रमोद देशमुख,अशोक माढेकर, बालकलावंत अथर्व देसाई यांचे ही स्वागत करण्यात आले. सूत्र संचलन समन्वयक दिनेश कवडे यांनी केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी केंब्रिज माध्यमिक विद्यालय, नांदेड च्या वतीने नाथा चितळे लिखित, डॉ. माणिक जोशी दिग्दर्शित “मिसिंग”, बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणी च्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “सक्सेस ॲप”, ज्ञान भारती विद्या मंदिर, नांदेड च्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित राहुल जोंधळे दिग्दर्शित “बुद्धाची गोष्ट”, जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर जिंतूर, परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, नागेश कुलकर्णी दिग्दर्शित “मदर्स डे” आणि नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखरणी, परभणी च्या वतीने त्र्यंबक वडस्कर लिखित, दिग्दर्शित “जड झाले ओझे” या नाट्यप्रयोगांचे उत्तम सादरीकरण झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक नाटकांना रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी पाच वाजेपर्एयंत कूण सहा नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.