नायगाव येथील विराट सभेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करण्याचे मराठा बांधवांना आवाहन
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांनी रक्त सांडवलं,अनेक जण शहीद झाले त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले.अनेक भगिनी विधवा झाल्या, म्हणून समाजाची एकजूट महत्वाची आहे कारण उद्याच्या दहा पिढ्या बरबाद होतील त्याकरिता आरक्षणाचा लढा चालू ठेवणे गरजेचे आहे.आरक्षणाच्या विरोधात कोणी आडवे येत असेल तर त्याला पुरून उरण्याची ताकद आपल्यात आहे,आपली एवढी मोठी शक्ती असताना आपण कमी पडू नये असे प्रखड मत मनोज जरांगे पाटील यांनी नायगाव येथील विराट सभेत केले.
नायगाव शहरातील बैल बाजारच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या विराट सभेमध्ये प्रारंभी मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होतात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रारंभी जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पवृष्टी करून वंदन केले. जिजाऊ वंदना घेतल्यानंतर नायगाव उमरी बिलोली धर्माबाद देगलूर तालुक्यातील जमलेल्या लाखो मराठा बांधवांना विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव घेतो मी त्यांचा वारसदार म्हणून पण आपल्या कॉलेज आणि संस्थेला ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले नाही तर आपल्या कुटुंबाचे नावे दिली आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम यांच्याकडून होत आहे.
असा घणाघात करीत ते पुढे म्हणाले मी माझ्या गोरगरीब मराठा बांधवांची व्यथा मांडली, गोरगरीब मराठा समाजाची मुले मोठे व्हावी ही भूमिका मांडत असताना मला शत्रू समजायला लागले, सरकारही शत्रू समजायला लागले, मला काहीही म्हटले तरी मी यांना कदापिही भीत नाही कारण माझी मला जात प्रिय आहे मराठा बांधवांना आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही.
या लढ्यामुळेच आतापर्यंत 35 लाख नोंदी सापडलेल्या आहेत येत्या 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळेलच, तेव्हा शांततेमध्ये आंदोलन चालू ठेवावे उग्रवादी आंदोलन करू नका, कारण यापूर्वी मराठ्यांच्या बाधवावर निष्पाप गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असे सांगत शेवटी मी सतरा दिवस उपोषण केले त्यामुळे माझी तब्येत खूप खालावली असल्याने मला जराही धक्का सहन होत नाही म्हणून मला जाण्यासाठी रस्ता द्यावा अशी विनवणी करत जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना एकत्र राहण्याचे या विराट सभेत संभोधित केले. या विराट सभेतील सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक मराठा बांधवांनी परिश्रम घेतले आहेत.
एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोन म्हणते देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही तुरुणाच्या आशा गगण भेदी घोषणेने नायगांव दणाणून गेले होते.
डॉक्टरांची पथक सेवत – नायगांव येथील सभेसाठी शहरातील डॉक्टरांचे एक पथक सभेच्या ठिकाणी सेवेसाठी सज्ज होते. बांधवाना आरोग्याची काही त्रास झाल्यास हे आरोग्य पथक प्राथमिक उपचार करण्यासाठीं सेवेत होते. जरांगे पाटील यांचे स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कुष्णूर, कुटुर फाटा.पळसगांव, देगाव.घुंगराळा.आदी ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
नायगांव तालुक्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सैविधानिक पद्धतीने सामाजिक आंदोलन करणा-या मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घ्या अन्यथा वाईट परिणामाला समोर जावे लागेल, जशास तसे पोलिसांवर ही गुन्हे आम्ही दाखल करू असा इशारा त्यानी नायगांव सभेत दिला आहे. पुढाऱ्यांनी जमिनीवर बसुन सभा ऐकली मनोज जरांगे यांच्या सभेचे एक वेगळेपण स्पष्ट दिसुन आले.
व्यासपीठावर फक्त जरांगे पाटील एकटेच, आणि सर्वात पक्षातील मराठा पुढारी समोर जमिनीवर बसुन जरांगे पाटील यांची सभा ऐकली हे या सभेचे विशेष होते. नायगांव येथील विराट सभा यशस्वी करण्यासाठी नायगांव, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड सकल मराठा समाजाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले होते.