नांदेड| नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिध्द असलेल्या माळेगाव खंडोबा यात्रेत झालेल्या पशू प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरला मंजूवाले यांचा अश्व बघीरा दोन दात गटामध्ये विजयी झाला असून मालक अनुज अडकटलवार यांना जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीमती मीनल करनवाल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पंजाब येथील अश्व लाईन मधील नामांकित असलेला आलिशान या रक्त वाहिनी असलेला अश्व बघीरा याने प्रसिध्द असलेल्या माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात भाग घेऊन दोन दात गटामध्ये विजेता ठरला .यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील गिरी, आणि गुट्टे ,निखिलेश देशमुख,आश्विन पवार, वासुदेव भोसले, प्रणव सोवठे,यांचा सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती, या अश्वाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, या विजया मुळे मंजूवाले यांचे कौतुक होत आहे