नांदेड

धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत जय हनुमान नगर सोसायटी येथे सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लाॅकचा लोकार्पण..

नवीन नांदेड l जिल्हा नियोजन समितीच्या २५/१५ ग्रामपंचायत धनेगाव अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे व पेवहर बलाक १० लक्ष रुपयाचा लोकार्पण सोहळा २० जूलै रोजी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर व नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे व जेष्ठ नागरिक श्रीनिवास माडेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमान नगर सोसायटी मधील मंदिरात सिमेंट काँक्रीट व सिमेंट रस्ता तयार करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडे केली होती, मागणीच्या दखल घेत ग्रामपंचायत कार्यालय यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत १० लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिला होता, या निधी अंतर्गत मंदिर परिसरात पेव्हर ब्लाॅक व लगत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला होता.

या कामाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला, यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर, याचा सह महिला जिल्हा प्रमुख वनमाला राठोड, महिला वैद्यकीय आघाडी प्रमुख नेहा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर बोटलवार, शिवाजी बुचडे, यांच्या सह महिला, नागरीक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!