नवीन नांदेड l मनपा नांदेड व कनिष्क नगरी वाघाळा यांच्या वतीने हरीत नांदेड अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन संबधीत पालकत्व स्विकारलेल्या महिलांनी केले पाहिजे असे मत सेवा निवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलेगकर यांनी केले.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था, वाघाळा नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान 2024 वृक्ष लागवड अध्यक्ष स्थानी सुरेश अंबुलेगकर व डॉ.मापारे सिडको क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.

मनपा नांदेड हद्दीत शहराती ल वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी कनिष्क नगरी वाघाळा नांदेड येथे लोक सहभागातून 61 ट्रि-गार्डसह वृक्षांची लागवड व संगोपन 21 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था वाघाळा येथे ट्री-गार्ड सह मोठ्या वृक्षांची लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी
डॉ.अर्जुन मापारे,सहाय्यक आयुक्त रमेश चावरे, बेग,रावण सोनसेळे , वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे, झडते,यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृक्षमित्र संतोष मुगटकर, प्रास्तविक दयानंद गायकवाड यांनी केले.

यावेळी लताबाई चौरे,अर्चना शिंदे,काजल चिंतोरे,जागृता ओढणे, रंजना सरोदे,प्रिया येडके, रूक्मिणी एडके, ममता हिंगोले, वर्षा चौरे, पुनम आढाव, पदमीनबाई ढवळे,शोभा गादेकर, खंडेराव वाघमारे, व कनिष्क नगरी पदाधिकारी यांनी वृक्षाचे पालकत्व स्विकारले असुन यावेळी शाल व पुष्प गुच्छ देऊन वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड तर्फे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दयानंद गायकवाड अध्यक्ष, दयानंद जोंधळे, सचिव छाया पंडित उपाध्यक्ष, वसंत सरोदे, रवी वाघमारे व संचालक मंडळ पदाधिकारी व परिसरातील खंडु गजभारे,राजेश एडके, सिध्दार्थ सरोदे,उपस्थित होते. यावेळी कनिष्क नगरी ६१वृक्षलागवड करण्यात आली. सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने, मालु एनफळे,यांच्या सह परिसरा तील नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.
