नांदेड
सिडको वृतपत्र विक्रेता टिन शेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नवीन नांदेड l लोकशाहीर सहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सिडको वृतपत्र विक्रेता संघटना टिन शेड येथे साजरी करण्यात आली, प्रारंभी महिला वितरक वंदना लोणे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे, संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे , यांच्या सह लोकमतचे गणेश डोळस, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते दौलतराव कदम, शेख सयोध्दीन,राम धांवडे, शुभम कुंभार, गजानन धांवडे, अमोल नांदेडकर, तातेराव वाघमारे, गणेश कांबळे, गणेश ठाकूर, साई गोटमवाड, कार्तिक बोटेवाड,महेश सुताडे, यांच्या सह वृतपत्र विक्रेता बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
