मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार..

नांदेड l सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महापालिकेच्या कामकाजास नवि दिशा देऊ पाहणाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महा पालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा दि. २३ जुलै २०२४ रोजी महापालिकेत कै.शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
काही दिवसापूर्वी महा पालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्याचाच भाग म्हणून इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ७५% पेक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यास इयत्ता दहावीतील २२ विद्यार्थांनां प्रत्येकी रु.११,०००/- व इयत्ता बारावीतील ०२ गुणवंत पाल्यांना प्रत्येकी रु.२१,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यामध्ये इयत्ता बारावीतील गुणवंत पाल्य अनुष्का रावण सोनसळे 79.50% , प्रेम गजानन रासे 78.67% तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत पाल्य श्रुती दिलीप जोशी 87.40% ,मयंक दत्ता कंठाळे, 92% ,विभोर राजेश शिंदे, 87.00 % ,गौरव हेमराज वाघमारे 83.40% सायली बालाजी रत्नपारखे 90.60% ,अथर्व संतोष जोशी 79.80% शशांक चंद्रमौली ओल्लेला 82.40% तनुजा रोहिदास भोसले 90.8% शामली शिवकुमार ठोंबरे 89.00% , हर्ष संतोष गुम्मलवार 86.20%, क्षितीज बालाजी लंकवाडे 91.00% , मधुरा गणेश भुसा 95.00 % आस्था वसंत पवार81.00% अमित भरत मुंढे 96.2 % अमित भरत मुंढे, 96.2 % श्रृती प्रल्हाद मानेकर 78.00% ,प्रणव संजय कुलकर्णी 75.40% कोंडीबा मनोहर कुंठे 82.40% , श्याम रमाकांत टाक 79.40% ,हर्ष आनंद दुड्डे 86.8% ,संभाजी हनुमंत ढोले 77.60% या पाल्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी महोदयांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यामुळे या सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून हा कार्यक्रम त्यांच्या भावी कारकिर्दीस प्रेरणा देणारा ठरेल असे प्रतिपादन केले केले.
तसेच मनपा आयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमातून महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे व या सत्कार सोहळ्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या जिवनामध्ये उंच भरारी घ्यावी,तसेच समाजामध्ये वावरत असताना एक सुजाण नागरिक होऊन आपली स्वतःची कारकीर्द घडवण्याबरोबरच उच्चपदस्थ जाऊन या संस्थेचे त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचे नावलौकिक करावे असा शुद्ध हेतू असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी केले तर सुत्रसंचलन कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सहाय्यक आयुक्त प्रशासन गुलाम मो.सादेक, कार्यालय अधिक्षक पदमाकर कावळे,कल्याण घंटेवाड, प्रधाण धम्मपाल, शुभांगी चौधरी, श्रध्दा बुरसे, श्रीरंग पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
