नांदेडसोशल वर्क

संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला उत्स्फूर्त सहभाग; संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड| संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. सुरवातीला जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी संविधान रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.

यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांची उपस्थिती होती. या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा. सर्वानी घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्ये त्यांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयील अधिकारी कर्मचारी, जाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत तसेच विविध महामंडळाचे कर्मचारी यांची उपस्थिती होते.

या संविधान रॅली मध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक कर्मचारी सुनिल पारधे यांच्या अधिपत्याखालील बँड पथक संच यांनी गीत सादर केले. या रॅलीमध्ये महात्मा फुले हायस्कुल येथील स्काऊट गाईड व एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंतराव नाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नोबल हास्कुल, पंचशिल विद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे रॅलीत सहभागी झाले होते तसेच जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!