नवीन नांदेडl सिडको व हडको परिसरातील गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ३ मार्च २४ रोजी अभिषेक, महापुजा महा आरती, पालखी मिरवणूक काढून महाप्रसाद वाटप करून ऊत्साहात प्रकट दिन साजरा करण्यात आला, यावेळी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

३ मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त हडको येथील गजानन महाराज मंदिर येथे सकाळी अभिषेक , महापुजा तर दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले या वेळी महाप्रसादचे आयोजक गजानन कते यांच्या वतीने भाविक भक्तांना वाटप करण्यात आले, यावेळी परिसरातील महिला सुमनबाई शहाणे, श्रीमती घोगरे, रत्नमाला टाक, चंदनकर यांच्या सह परिसरातील महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको येथील एन. डी. ३ व व एन. डी. ४२ एरिया संभाजी चौक सिडको येथील गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्रीकांत अभिषेक, ८ वाजता होमहवन महापुजा करण्यात आली तर १० ते १ दरम्यान श्री पालखी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी काळा हनुमान भजनी मंडळ व सिडको हडको भजनी मंडळ यांच्या सहभाग होता, यावेळी दुपारी १ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आला, यावेळी हजारो भक्त भाविकांनी महाप्रसाद यांच्या लाभ घेतला, यावेळी समस्त गजानन महाराज मंदिर भक्तगण मंडळ यांनी परिश्रम घेतले.

