
उमरखेड,अरविंद ओझलवार। वाढत्या वैज्ञानिक युगात मानवाच्या उत्पत्ती, निर्मिती बाबत ब्रह्ममांडातील भौगोलिक घडामोडी व चंद्रावरील मानवी पाऊल यासंबंधीची सखोल माहिती तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ब्रह्ममांडातील ग्रह, ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक असे भौगोलिक वातानुकूलित तारांगण उमरखेड शहरात निर्मिती बाबतचा दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात सांगितले.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी तारांगणाच्या माध्यमातून भौगोलिक ज्ञानाचा साठा उमरखेड शहरात निर्मितीसाठी भरपूर संघर्ष करावा लागला.आ.नामदेवराव ससाणे यांचे विशेष प्रयत्नातून भव्यदिव्य अशी तारांगणाची वास्तू आपण आपण लोकनेते स्व.जेठमलजी माहेश्वरी यांच्या पुण्यतिथी दिनी लोकार्पित करीत असल्याचे नितीन भुतडा यांनी यावेळी सांगितले. वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्चून तारांगण उभारण्यात आले असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भौगोलिक अभ्यासासाठी तारांगणाचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर लोकार्पण सोहळ्याचे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी अध्यक्ष सुभाषराव दिवेकर, अंबादासपंत साकळे, विजयराव माने,नितीन माहेश्वरी, अभियंता सुरेन्द्र कोडगिरवार,माजी नगरसेवक दिलीप सुरते, अँड.रायवार, नगरसेविका सविता पाचकोरे आदींची उपस्थिती होती.
कार्येक्रमाचे अध्यक्ष सुभाष दिवेकर यांनी भूतो न भविष्यती असे तारांगण नितीन भुतडा यांचे दूरदृष्टीतुन उभारल्याचे सांगत त्यांचे माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगत विकासात्मक कामाबद्दल भुतडा यांचेवर स्तुतीसुमने त्यांनी उधळली. तारांगणाच्या लोकार्पण सोहळ्यास तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी तारांगणाच्या लोकार्पण फलकाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तारांगणाचे व्यवस्थापक कुणाल देशमुख यांनी उपस्थितांना भौगोलिक ग्रह, ताऱ्यांचे प्रात्यक्षिक प्रक्षेपण दाखविले. सदर लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन अजय पांडे तर प्रास्ताविक महेश काळेश्वरकर यांनी केले.
लोकार्पण सोहळ्यात माजी सभापती अँड.शैलेश मुंगे,डॉ. जयशंकर जवणे,डॉ.धनंजय व्यवहारे,कैलास उदावंत, अतुल खंदारे,सतीश मुटकुळे,किसनराव वानखेडे,विजय आडे,भाविक भगत, चंदू पाटील वानखेडे, महावीर महाजन, अँड.विजय गुजर, अँड.रतन चव्हाण, प्रणित मैड, मनोज पांडे,सुधाकर लोमटे, संतोष पवार, पवन मेंढे,बबलू मैड, योगेश ठाकूर, शिव कलोसे, ॲड.अस्मिता आढावे, मनीषा काळेश्वर कर ,योगिनी पांडे ,उषा तास्के, शितल धोंगडे,माधुरी देशमुख, अल्का मुडे, ज्योती डुकरे,राधा रावते, श्रद्धा मामीडवार इत्यादींची उपस्थिती होती.
