नांदेड। नांदेड जिल्ह्यात सराईत गुन्हेगार यादीतील 60 इसम हद्दपार, 14 स्थानबध्द करण्याच्या प्रतिबंधात्मक कार्यवाहया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालय जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुक-2024 अनुषंगाने श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 30 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सन 2023-24 या कालावधीत 20 टोळ्यामधील 60 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन MPDA अंतर्गत 14 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयात अभिलेखावरील पाहीजे/फरारी आरोपी शोध मोहीम राबवुन अभिलेखावरील 136 पाहीजे असलेले आरोपी ताब्यात घेण्यात आले असुन 12 फरारी आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे आदेशानुसार सन 2023 मध्ये बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगणारे इसमाविरुध्द 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच सन 2024 मार्च अखेर बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगणारे इसमाविरुध्द 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पो. स्टे. शाखा प्रभारी अधिकारी हे दिनांक 03/04/2024 रोजी स्वतः कोबींग ऑपरेशन राबवुन कोबींग ऑपरेशन दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर नांदेड जिल्हयातील लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांचा शोध घेवुन 82 इसमांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.