
नांदेड। जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहिती काढून त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. त्यानूसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी नांदेड शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे आरोपीतांविरुध्द कायदेशीर कारवाई करणेबाबत स्थागुशाचे पथकाला आदेश दिले होते.
दि. 13/04/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि श्री. दशरथ आडे स्थागुशा पथकासह वजिराबाद हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्तबातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, गोवर्धन घाट पुलाखाली एक इसम थांबलेला असून त्याचेकडे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस असल्याची माहिती मिळाल्याने तसी माहिती वरीष्ठांना देवून त्यांचे पथकाने सापळा रचून आरोपी नामे 1) मंगेश घनश्याम सोनसळे, वय 36 वर्ष, व्यवसाय मजुरी रा. राहुल नगर, एन. डी. 31 सिडको, नांदेड यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष जाऊन झडती घेतली.
त्याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कटटा) व एक जिवंत काडतूस असा एकूण किंमती २०,६००/- रुपयाचा मुद्देमाल मिळाला असून त्यास मिळुन आलेल्या अग्निशस्त्राबाबत विचारपुस केली असता सदरचे अग्निशस्त्र त्याने त्याचा मित्र शेख अहेमद ऊर्फ शेख असलम व त्याची पत्नी यासमिन बेगम शेख अहेमद याचेकडून २०,०००/- रुपयास खरेदी केल्याचे सांगितले आहे. नमूद आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. मिळुन आलेल्या आरोपीस पोलीस ठाणे वजिराबाद यांचे ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पोउपनि श्री. दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, पोना कलंदर, पोकॉ/1929 राजीव बोधगीरे, पोकॉ/1026 शेख इसराईल, पोकॉ/816 साहेबराव कदम, पोकॉ/1041 अनिल बिरादार, पोकॉ/698 अकबर पठाण यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
