
नवीन नांदेड। श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था असून या पतसंस्थेची निवडणूक या वेळेस मोठी अटीतटीची झाली.
डॉ शंकरराव चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढी म नांदेड पंच वार्षिक निवडणूक २०२३-२०२८ साठी डॉ शंकरराव चव्हाण सहकार विकास पॅनल कडून सर्वसाधारण प्रवर्गातून अमरसिंह राजपालसिंह बायस व समता पॅनल कडून सर्वसाधारण प्रवर्गातून सचिन आनंदराव पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रवर्गातून शंकर बापुराव घाटोळ हे भरघोस मतांनी विजयी झाले असुन त्यांनी हा विजय मिळवल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या यशाबद्दल आज प्रशालेत सर्व अधिकारी, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
विजयी उमेदवारांचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, संस्थेच्या उपाध्यक्षा माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण, संस्थेचे सचिव तथा माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड.उदय निंबाळकर, इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे मुख्याध्यापक बी.एस.शिंदे, उपमुख्याध्यापक जी.एम.शिंदे,
पर्यवेक्षिका जे.सी .महाराज, पर्यवेक्षक ए. आर .कल्याणकर जेष्ठ शिक्षक डॉ .अण्णा गरड शालेय समितीचे अध्यक्ष डॉ वसंत शिंदे, परसराम गंधपवाड रमेश सज्जन.जेष्ठ शिक्षिका अनघा नांगरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहित अनेकांनी अभिनंदन केले आहे.
