
मुंबई/नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ गणेश कदम यांना मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून कोविड काळात ग्रामीण भागातून रुग्णांची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल Maharashtra Excellence Award 2023 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात डॉ गणेश कदम यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरु करून गोरगरिबांची सेवा करण्याचा उद्देश ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नाना चांगले यश मिळाले असून, गत दोन वर्षांपूर्वी कोरोना काळाने थैमान घातले होते. अश्या उद्भवलेल्या कोविड -१९ च्या काळात रुग्णसेवा देण्यासाठी हिमायतनगर शहरातील बहुतांश डॉक्टर मंडळी भीत होती. तर अनेकांनी आपली व्यवसाय बंद ठेऊन स्वतःच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य दिले होते. परंतु या जीवघेण्या कोरोना काळात डॉ. गणेश कदम यांनी अहोरात्र आपल्याकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना उपचार करून सेवा दिली. याच सेवेचे त्यांना फलित प्राप्त झालं असून, याची दखल Human Right Mirror या संस्थेने घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात Human Right Mirror तर्फे Maharashtra Excellence Award 2023 प्रसिद्ध सिनेतारका अमिषा पटेल आणि आंतरराष्ट्रीय अँकर सिमरन अहुजा यांच्या हस्ते Maharashtra Excellence Award 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्पेशल गेस्ट म्हणून रोशनी कपूर उपस्थित होत्या. डॉ. गणेश कदम यांना ग्रामीण भागातून रुग्णसेवा केल्याबद्दल मिळालेल्या Maharashtra excellence 2023 पुरस्कारबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी, राजकीय व्यक्तिमत्तव व सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
