
हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरच्या शिक्षिका माधुरी तिप्पनवार यांनी गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सुपर मास्टर ऍथलेटिक्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) मिळविला आहे. यासोबतच त्यांच पती परमेश्वर तिप्पनवार यांनीही पुरुषांच्या शर्यतीत चौथा क्रमांक मिळवून हिमायतनगर शहराचा गौरव केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बॉम्बे स्टेडियम, गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय सुपर मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेचा शनिवारी शानदार समारोप झाला. ही स्पर्धा नॅशनल मास्टर गेम्स, गोवा 2024 द्वारे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारत भरातील विविध वयोगटातील खेळाडूंसाठी 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील राजा भगीरथ विद्यालयात कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षिका माधुरी परमेश्वरा तिप्पनवार यांनी सहभाग घेतला होता. तीन मीटर उंच उडी मारून त्याने सिद्ध केले की, एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर वयाचा अडथळा येत नाही. नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत, त्यांनी ट्रिपल जंप ४५+ वयोगटातील महिलांमध्ये तिहेरी उडीत घेऊन द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) मिळविला आहे.
त्याचप्रमाणे श्री परमेश्वर लिंगारेड्डी तिप्पनवर यांनी देखील पुरुषांच्या 50+ गटात 5 किमी शर्यतीत भाग घेतला आणि चौथा क्रमांक मिळविला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय सुपर मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमी नागरिक, शिक्षक, त्यांचे सहकारी, नातेवाईक आणि शहरवासीयांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
