नांदेडमहाराष्ट्र

गुत्तेदाराने काम अर्धवट ठेऊन पलायन केल्यानं पळसपुर डोलारी सिरपलीच्या ग्रामस्थांनी उचलले उपोषणाचे हत्यार

हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यातून विदर्भातील ढाणकी, उमरखेड कडे जाणाऱ्या पळसपुर, डोलारी, शिरपली , शेलोडा, प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून अर्धवट असल्याने नागरिकांनी गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दहा दिवसात काम करा अन्यथा दिनांक १  मार्च पासून काम सुरू होईपर्यंत उपोषण करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह, प्रशासकीय यंत्रणेला दिला आहे.

हिमायतनगर, पळसपुर डोलारी, सिरपली या रस्त्याच्या कामास ७ जानेवारी २०२२ रोजी सुरुवात झाली असून, आज पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पुर्ण झाले नसल्यामुळे संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करून वरील तिन्ही गावच्या ग्रामस्थांना व प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रकार निदर्शनास येत असल्याने येथील गावकऱ्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नांदेड यांना हिमायतनगर तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. 

निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपल्ली या प्रधानमंत्री ग्राम सडक रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदार व अधिकारी करीत नसल्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे सर्व काम अर्धवट अवस्थेत असून, या रस्त्यावरून येजा करणे अत्यंत अवघड व जीवघेणे झाले आहे. सदरील काम येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सुरु न झाल्यास आम्ही पळसपुर, डोलारी ,सिरपली, येथील सर्व नागरिक गावकरी यांच्यासह सामूहिक साखळी उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.

अन्यथा २९ फेब्रुवारी २०२4 रोजी पर्यंत कामास सुरुवात न झाल्यास १ मार्च रोजी हिमायतनगर येथील नडवा पुलाजवळ साखळी उपोषणास बसणार आहोत. याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर तीन गावच्या ग्रामस्थांच्या विनंतीवरून डॉक्टर मनोज राऊत डोलारीकर , नागोराव शिंदे पळसपुरकर , गंगाधर गायकवाड दिघीकर , शेषराव वाघेकर ,साहेबराव  कदम डोलारी ,बंडू उर्फ विठ्ठल आनंदराव पवार यांच्या सह्यानिशी आज हिमायतनगर तहसीलदार मार्फत कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?