एसटीच्या नांदेड आगारात कामगार- कर्मचार्यांनी घेतली आंतरराष्ट्रीय धोके निवारण दिवसाची शपथ

नांदेड| जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाने जगात शांतता नांदावी या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्रसंघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने १३ ऑक्टोंबर हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे व राज्य शासनाने दि. ८ सप्टेंबर २०१७ पासून १३ ऑक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेशित केले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली (एनडीएमए) यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटीबद्ध होण्यासंदर्भात सन २०२३ या वर्षापासून प्रतिज्ञा तयार केली असून ती आपल्याला शपथ घ्यावयाची असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १३ ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रतिज्ञा घेण्यात आली. ही प्रतिज्ञा (शपथ) एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी सामूहिकरित्या कामगार- कर्मचार्यांना दिली.
यावेळी स्थानक प्रमुख यासीन हमीद खान, पाळी प्रमुख संभाजी जोगदंड, मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे, कामगार नेते जय कांबळे, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार श्री नितीन मांजरमकर यांनी मानले. याप्रसंगी आगारातील कामगार- कर्मचारी बंधु- भगिणी बहुसंख्येने उपस्थित होते.
