नांदेडलाईफस्टाईल
हदगाव येथे स्वीप कक्षा मार्फत मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट चे उद्घाटन

हदगाव| 15,हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 84,हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघा मध्ये स्वीप कक्षा मार्फत मतदान जनजागृती करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आधुनिक काळानुरूप नवमतदारांना आकर्षित करण्याकरिता सेल्फी पॉइंट चे उद्घाटन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अविनाश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार हिमायतनगर च्या तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, गटशिक्षणाधिकारी किशन फोले,केंद्रप्रमुख संदेश चोंढेकर उपस्थित होते. नव्याने मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या नव मतदरा करीता महाविद्यालयांच्या परिसरात पुढील काही दिवस हा सेल्फी पॉइंट राहणार आहे.आधुनिक फोटोच्या काळात हा सेल्फी पॉइंट तरुणांसह महिला व अनेकांमध्ये आकर्षण ठरत आहे.
