नवीन नांदेड। गोदावरी अर्बन मल्टी ऑप सो. लि. सिडको शाखेच्या वतीने नवरात्र महोत्सव निमित्ताने सन्मान नवदुर्गाचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक खा.श्री. हेमंतभाऊ पाटील व अध्यक्षा सौ. राजश्रीताई पाटील , व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर , मुख्यालय चिफ मॅनेजर सौ.सुरेखा दवे मॅम, प्रिन्सिपल मॅनेजर विजय शिरमेवार व मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 18 आक्टोबर 23 रोजी शाखा सिडको येथे पोलिस महिला अधिकारी ,या कर्तृत्ववान महिलांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या पोलिस महिला अधिकारी यांनी गोदावरी अर्बन ने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केलेव आज पर्यत कोणी आमच्या कार्याची दखल घेतली नाही ती गोदावरी अर्बन बैंक नी घेतली असे त्यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे महिला उपनिरीक्षक माया भोसले, माधुरी यवलिकर , स्नेहा पिंपरखेडे , जयश्री गिरे , महिला पोलीस कर्मचारी अश्विनी मस्के , भाग्यश्री सूर्यवंशी ,महिला पोलीस कर्मचारी अनिता वाडीकर उपस्थित होते. यावेळी सिडको शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.