नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे नांदेड दौर्यावर आल्या होत्या. त्यांची भेट घेऊन त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद चौक,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नागरिक सेल आणि नांदेड ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिति तथा सकल ज्येष्ठांच्यावतिने भेट घडवून आणून निवेदन देण्यासाठी डॉ.सुनिल कदम यानी मोलाचे सहकार्य केले.

निवेदन देताना व चर्चा करताना सर्वश्री डॉ.सुनिल कदम (जिल्हाध्यक्ष रा.काँ.पा.), डॉ.हंसराज वैद्य (अध्यक्ष सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ), गिरिष बार्हाळे (अध्यक्ष ज्ये.ना.संघ वजीराबाद), इंजि.विश्वांभर भोसीकर अध्यक्ष रा.काँ.पार्टी ज्ये.ना.से.), माधवरावपवार काटकळंबेकर, डॉ.देशमुख, प्रभाकरराव कुंटूरकर अदि ऊपस्थित होते. खा.सुपिया ताईनीं सर्वांबरोबर चर्चा करून ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्या बाबत जाणून घेतले व संसदेत या संदर्भात आवाज उठवीण्याचे मान्य केले.

सर्व प्रलंबित प्रश्न सोडऊन घेण्यासाठी सहकार्य व पाठ पूरावा करण्याचे आश्वासन देऊन शेजारिल राज्या प्रमाणे गरजू, दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित शेतकरी, शेत मजूर, कष्टकरी, कामगारव विधवा महिलांना प्रतिमहा 3500/- मिळवून देण्याचे मान्य केले.त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version