लोहा| बदलत्या शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्ययन-अध्यापन सुलभ होण्यास मदत होणार आहे .शिक्षकांनी बोलायचे अन विद्यार्थ्यांनी ग्रहण करायचे ही पद्धती आता बाजूला सारून वर्गात विद्यार्थ्यानीच प्रश्न तयार करायची उत्तरे शोधायची जेणेकरून जे “आव्हान ” समोर आहे त्याची सोडवणूक तो स्वतः करेन व शिक्षण प्रक्रिया सुलभ होईल यासाठीच हे प्रशिक्षण आहे असे मार्गदर्शन लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी केले.
सोनखेड येथील जे के एम प्राथमिक व माध्यमिक शाळा व संत गाडगे बाबा विद्यालयात अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष याचे चौथ्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू आहे.गटसाधन केंद्र लोहा च्या वतीने आयोजित प्रशिक्षणा च्या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शन करताना बिईओ सतीश व्यवहारे यांनी तीन टप्प्यात जे प्रशिक्षण जवळपास आठशे शिक्षकांना दिले त्यात प्रशिक्षणा चे फलित समोर येत आहे “.सेल्फी विथ सक्सेस ” अंतर्गत दररोज किमान हजार दीड हजार फोटो मोबाईलवर येतात.या प्रशिक्षणाचा फायदा निश्चितच आपल्या अध्ययन अध्यापनात होणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी बी पी गुट्टे, अंजली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाच दिवशीय प्रशिक्षण सोनखेड येथे सुरू झाले आहे. प्रशिक्षण समन्वयक संजय अकोले, असून सह नियंत्रक हवगी जामकर, तंत्र स्नेही सर्वजित धुतराज, ते विभागीय सुभलक म्हणून दत्तात्रय मोहिते, मोहन चौधरी, नागोराव जाधव, ओंमकार बोधनकर, एस पी केंद्रे, इंजि. संतोष जोशी , संभाजी भुरे, विजयकुमार कोदले हे प्रशिक्षण देत असून १५६ शिक्षक उपस्थित आहेत. बिईओ व्यवहारे व टीमने चांगले नियोजन केले असून रुचकर भोजन व्यवस्था सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खूप आवडले.