महाशीवरात्रीच्या पर्वावर लाखो भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन


देवाधिदेव महादेवाचा उत्सव महाशिवरात्री नीमीत्ताने गेल्या महिन्या पासून जय्यत तयारी सुरू झाली होती, रंगरंगोटी सह मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढेच्या – लोंढे श्री परमेश्वर दर्शनासाठी दाखल झाले होते. यामुळे शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले असुन, महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु – पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन आले आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री परमेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार सांगतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्रीचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.सुरेश महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव – पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली.

यामध्ये मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार सौ पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, राजाराम झरेवाड, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुरावजी भोयर, यात्रा सब कमिटीचे सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, अनिल भोरे, संतोष गाजेवार, कुणाल राठोड, गजानन चायल, ज्ञानेश्वर शिंदे, विपूल दंडेवाड, कल्याण ठाकुर, सुधाकर चिट्टेवार, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, उदय देशपांडे, दत्ता काळे, राम सूर्यवंशी, आशुतोष बोरेवाड, रामराव सूर्यवंशी, राजू गाजेवार, अडबलवाड सर, राजू राहुलवाड, गजानन हरडपकर, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, दत्ता शिराने, सोपान बोंपिलवार, अनिल नाईक, आदींसह विश्वहिंदू परिषद व बजरंग दल, आणि युवा स्वयंसेवक व गावकरी मंडळी उपस्थीत होते.
शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड – बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे लावले जाऊन पुजा- अचर्ना करण्यात येऊन श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला जातो. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ,मराठवाडा, कर्नाटक , आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थित होऊन श्रीचे दर्शन घेतले, यावेळी भाविक भक्तांना विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे दुधाचे वितरण, श्री विश्वकर्मा कारपेंटर एकता युनियन व खाजगी क्लासेस असोसिएशन तर्फे केळीचे वितरण, बुलढाणा अर्बन, महाराष्ट्र बैंक व पवन फर्निचर तर्फे भाविकांना उपवासाच्या फराळाचा साबुदाणा व परमेश्वर मांगुळकर यांनी पारायनार्थी साधकांना चहाचे वितरण करून पुण्य पदरी पाडून घेतले.
