नायगाव, रामप्रसाद चन्नावार। भारत देश स्वातंत्र्य झालेल्या काळापासून केंद्र सरकार व राज्य सरकार धनगर समाजाच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आक्रमक झालेल्या धनगर समाजाने नांदेड ते हैदराबाद महामार्गावर नरसी चौक येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.
यावेळी चारही महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या मागील बरेच दिवसापासून मराठा समाज त्यांच्या मागण्यासाठी तीव्र निदर्शने करताना पाहावयास मिळत आहे ,आणि आता धनगर समाजही आपल्या मागण्यासाठी राज्यात आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाला ओबीसी प्रवर्गातून वगळून एस .टी .चे आरक्षण लागू करून अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे .
या मागण्यासाठी नरसी चौक येथे एल्गार पुकारण्यात आला आहे. स्वातंत्र्य काळापासून धनगर समाजाला एस. टी. आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे .मागील अनेक वर्षापासून धनगर समाज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे, परंतु महाराष्ट्र शासन व केंद्र शासन दुर्लक्ष करीत आलेले आहेत. त्यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत धनगर समाजाला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नये असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आलेला आहे.
या सक्काजाम आंदोलनात भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, माधव चिंतले, संजय चोंडे ,बालाजी लव्हाळे, पांडुरंग बागडे, माधवराव डोणगावे, विश्वनाथ बडुरे, नारायण कोसंबे, प्रदीप झेले आळंदीकर, नागनाथ मुंडकर ,समृद्ध चोंडे, भास्कर कोकणे ,दिगंबर झुंबाडे, शामसुंदर कोकणे ,महादेवराव मेकाले, बालाजी नारे, संदीप लव्हाळे, परमेश्वर लोहगावे ,वैजनाथ लोहगावे, शंकर भेरे ,यांच्यासह मोठ्या संख्येने सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते.
सकल धनगर समाजाच्या प्रमुख चार मागण्या पुढील प्रमाणे सकल धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण लागू करून अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे. मेंढपाळ बांधवांना वन संरक्षण कायदा मंजूर करून प्रत्येक जिल्ह्यात 1000 हेक्टर वन जमीन उपलब्ध करून देणे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण ज्या मंत्र्यांसमोर झाली ते मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेणे. धनगर समाजासाठी चे 1000 कोटी व शेळी, मेंढी कर्जाकरिता दहा हजार कोटी त्वरित उपलब्ध करून देणे.