नायगांव नगरपंचायतीच्या वतीने “स्वच्छता हीच सेवा” उपक्रमास प्रचंड प्रतिसाद
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने नायगांव नगरपंचायतीच्या वतिने स्वच्छता पंधरवाडा अभिमान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
नायगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मंजुषा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 01 ऑक्टोबर- 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्याने नायगांव शहरात श्रमदानाने नगरपंचायत ते साईबाबा मंदिर ते कृषि उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड ते नगरपंचायत कार्यालय ते नाना नानी पार्क जुने नायगाव अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात शालेय विद्यार्थी, व्यापारी नागरीक पत्रकार यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून या स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने नायगाव शहरातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत नगरपंचायतचे सर्व कर्मचा-यांरी व नागरीकांनी या श्रमदानामध्ये आपला सहभाग नोंदविला होता.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ मिनाबाई सुरेश कल्याण .उपनगराध्यक्ष श्री. विजय पा. चव्हाण गटनेते – श्री. सुधाकर पा.शिंदे, मुख्याधिकारी – श्रीमती मंजुषा भगत श्री संतराम जाधव.रामेश्वर बापुले, सुनित देबडवार, श्रीधर कोलमवार. संभाजी भालेराव. मुन्ना मंगरुळे. गणेश चव्हाण.बंन्टी सुर्यवंशी. भिमा गोवंदे. रमेश चव्हाण. संगिता सरोदे . प्रविण भालेराव.प्रथमेश भालेराव. व नगरसेवक नगरसेविका.सर्व कर्मचारी उपस्थित होते.