आरोग्य विभागाच्या हत्तीरोग अभियानाची हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरातून सुरुवात

हिमायतनगर,परमेश्वर काळे | राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमे हिमायतनगर शहरासह तालुक्यातील गावा गावांमध्ये दिनांक 27 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेचा शुभारंभ हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातून करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही सि.जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश पोहरे यांच्या उपस्थितीत दि. 26 मार्च रोजी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना हत्ती रोगाच्या गोळ्या देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी संचालक लताबाई मुलंगे, अनिल मादासवार, संजय माने, विलास वानखेडे, रमेश पळशीकर, रामभाऊ सूर्यवंशी, देवराव वाडेकर, मारोती वाघमारे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहर व तालुक्यातील गावा गावांमध्ये वयोगटा नुसार डी. ई. सी. गोळ्या व अँबेंडोझॉल या हत्ती रोगाच्या गोळ्या घरो घरी जाऊन वितरण करून खाऊ घातल्या जात आहेत.
या मोहमेला यशस्वी करण्यासाठी डॉ. मामिडवार मॅडम, रमेश धांडे पाटील, मेश्राम सिस्टर, आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी दिलीप हनमंते, राजेश कल्याणकर, गजानन डुकरे, वंदना रचावार, भाग्यश्री मिरेवाड ,सतीश भरांडे, गणेश वाघमारे, श्रीनिवास डोपलवार, पंडित साबळे, धर्मपाल पाटील व जिल्हा परिवेक्षक साईबाबा बनसोडे सह ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालायन्तर्गत सर्व अधिकारी कर्मचारी घरो घरी जाऊन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
