महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,यांनी अनेक योजना राबविल्या,जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर..

नवीन नांदेडl महाराष्ट्र राज्यातील एकमेव मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी राज्यातील सर्वच महिलांना माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करून मुख्यमंत्री कार्यकाळात सर्वच घटकां तील नागरीकांना विविध योजना लागू केला असल्याचे नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी धनेगाव येथे आयोजित माझी लाडकी बहीण योजना आयोजित मेळाव्यात केले.
शिवसेनेच्या वतीने नांदेड दक्षिण तालुका यांच्या वतीने जय हनुमान नगर सोसायटी धनेगाव नांदेड येथे घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याचा योजनेचा महिला मेळाव्यात नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख आनंद राव पाटील बोढांरकर, यांच्या सह परिसरातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून अर्ज नोंदणी केली.
शिवसेना नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्या वतीने धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जय हनुमान नगर सोसायटी येथे २० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाइन व ऑफलाईन योजना अर्ज भरण्यासाठी विशेष महिला मेळावा जिल्हा परिषद शाळा मुझामपेठ, ग्रामपंचायत धनेगाव व जय हनुमान नगर सोसायटी धनेगाव या तिन ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,नांदेड दक्षिण शहरप्रमुख तुलजेश यादव, शिवसेना महिला नांदेड दक्षिण आघाडी जिल्हाप्रमुख सौ.वनमालाताई राठोड, शिवसेना महिला आघाडी वैद्यकीय जिल्हाप्रमुख सौ.स्नेहाताई पाटील,सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज, धनेगाव शाखा प्रमुख रूपेश देशमुख,ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव बुचडे,राजेश्वर बोटलावार,ग्रामसेवक विठ्ठल सुर्यवंशी, अंगणवाडी व्यवस्थापक राठोड,ग्राम पंचायत सदस्य जळबा बुचडे,धोडींबा कांबळे, साहेबराव कांबळे, मुद्रीका कदम, महिला पोलीस पाटील महानंदा यलगंद्रवार, बाभळेबाई, मुद्रकबाई कदम, धोडींबा कांबळे,बाळु गुडेवार,माजी पोलीस पाटील,गोपीचंद पाटील धनेगावकर, याशूभाई, बाळु गुडेवार, सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीनिवास माडेवार, तर प्रास्ताविक बालाजीराव गाडगे यांनी केले.
यावेळी अंगणवाडी मदतनीस असमा बेगम मोहमद अशफाक, शाहूबाई मानसिंग कांबळे, मोनिका नारायण धनेगावकर, आप्रुगा मारोती नामवाडे,यांच्या सत्कार आयोजक यांच्या वतीने करण्यात आला, या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
