सरकारची हुशारी उघड..! पोहे व मैदा अर्धा किलो ने वाढविला; डाळ रव्याला अर्धा किलोचा ‘कट’
हदगाव,शे चांदपाशा| यंदाच्या दिवाळीत 100रु आनंदाचा शिधा वाटप होत असुन, या मध्ये सरकारने डाळ व रव्याला अर्धा किलोच ‘कट ‘मारत पोहे मैदा अर्धा किलोने, वाढविलेला आहे. त्यामुळे विद्यमान सरकारची ‘ हुशारी ‘ उघडकीला आली आहे.
हदगाव तालुक्यात दोन शासकीय धान्याचे गोडाऊन असुन एक हदगाव शहरात तर दुसरे तामसा या ठिकाणी आहे. हदगाव गोदाम येथे आनंदाचा शिधा 31685 प्राप्त झाला आहे. यात साखर 31685 नग,
चनादाळ 31685 नग, रवा 15860 नग, पामतेल 31685 नग, पोहा 12000 नग, मैदा निरंक अशी महिती पुरवठा विभागातून मिळाली आहे.तर शासकीय धान्य गोदाम तामसा .. येथे साखर -18873 पॉकीट, चणाडाळ-18873 पॉकीट, रवा -18873 पॉकीट, खाद्य तेल-18873 पाँ., पोहा – 18840 पॉकीट, मैदा – निरंक अशी माहीती मिळाली आहे.
दिपावळीच्या निमित्तानं शिधा जिन्नस संच आनंदचा शिधा सवलतीच्या दरात वाटप करण्यात येत असल्याच पुरवठा विभागाकडुन सागण्यात आलेले आहे दिवाळी पुर्वीच आनंदाचा शिध्याचे वाटप करण्यात येणार असल्याच्या सुचना आहेत अस पुरवठा विभागा कडून सागण्यात आलेले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013अतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे मधील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुंटुबशिधापञिका धारक तसेच दारिद्रयरेषेवरील एपीएल, केशरी, शेतकरी शिधाधारकांना शिधाजिन्नस समाविष्ट असलेले संच आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय शासन दरबारी घेतलेला आहे. हा आनंदाचा शिधा 25 आक्टोबर ते 30 आक्टोबर ते नोव्हेंबरपर्यत ई-पास प्रणाली द्वरे 100 रु. प्रतिसंच देणाच्या सुचना आहेत.
सरकारची हुशारी…..!
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत दिवाळी सणानिमित्त 100रु. सहा शिधाजिन्स देणार असल्याची मोठ्या थाटात घोषणा केली. परंतु पुर्वी हरभरा दाल, रवा, पांमतेल, साखर प्रत्येकी एक किलो आले होते. सध्या रवा, चन्याची दाळ मध्ये अर्धा किलोच ‘कट ‘मारलेला आहे.
तात्काळ वाटप करण्याच्या सुचना – पुरवठा अधिकारी तामसकर
आनंदाचा शिदा त्वरीत स्वस्त दुकानदारा मार्फत लाभर्थ्याना वाटप करण्याच्या सुचना दिलेल्या असुन फक्त मैदा येणे बाकी असल्याचे प्रभारी पुरवठा अधिकारी तामसकर यांनी सागितले .