क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीसाठी 10 नोव्हेंबरपर्यत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!
aaa

नांदेड| विद्यार्थ्यांना खेळाविषयी असलेले ज्ञान व कौशल्याबाबत व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांना भारतीय खेळांचा इतिहास, स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ, भारतीय खेळाडू इ. बाबत जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात येते.

केंद्रीय युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने फिट इंडिया क्विझ-3 या सामान्य ज्ञान चाचणीसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांची बक्षीसे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले आहे. या चाचणीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांनी https:/fitindia.nta.ac.in/ या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबरपर्यत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

केंद्रीय युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीत प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळा/ महाविद्यालयातील विद्यार्थी व शाळा यांनी सहभाग नोंदवावा. शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन 2019 पासुन करण्यात येत आहे. सन 2022 मध्ये फिट इंडिया क्विझ- 2 चे आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे फिट इंडिया क्विझ-3 साठी शाळा व विद्यार्थ्यांसाठी 3 कोटी 25 लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत, असे जिल्हा क्रीडा कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!