
हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव शहरात व परिसरात अवैधरीत्या मटका व जुगार अड्डेअनेक दिवसापासून जोरात सुरू आहेत. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हदगाव तालुक्यातील वाळकी या गावी गुरुवारी धाड टाकून मटका घेणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन हजार रुपये व जुगाराच साहित्य जप्त केले. त्यांच्या विरोधात हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. मात्र हदगाव शहरात चालणाऱ्या मटका व जुगार अड्ड्यावर धाड न टाकता हदगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वाळकी या गावातच स्थानिक गुन्हा शाखा ने धाड टाकावी. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत स्थानिक पोलिसांना या बाबतीत काहीच माहिती नसावी अधिक माहिती घेतली असता व नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागने दि 9मे 2024रोजी शहरातील अवैधरित्या मटका व जुगार अड्ड्यावर धाड न टाकता हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाळकी (खुर्द) गावातच धाड टाकावी. यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यशैली विषयी मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आणखीन विशेष म्हणजे या धाडी विषयी स्थानिक पोलिसांना मात्र कोणतेही गांभीर्य दिसून आलेले नाही.
हदगाव शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणात मटका जुगार गुटखा व अवैध दारू सर्रास ग्रामीण भागात विक्री होत असताना हे स्थानिक पोलीस व नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती नाही. याबाबत मात्र नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक नांदेड स्थानिक गुन्हे शाखा विभाग का माहिती घेत नाही आणि यांच्यावर धाडी का..? टाकत नाही. असा सवाल नागरिक विचारीत असताना दिसून येतात.
