डाक विभागाच्या अपघाती विम्याची रक्कम मयताच्या नातेवाईकांना सुपूर्द

नांदेड। नांदेड येथील कै. सटवाजी आनंद टारके यांनी पोस्ट ऑफिस मधून टाटा AIG कंपनीचा अपघाती विमा ३९९ रुपयांचा काढला होता. अचानक काही दिवसांनी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या वारसांनी डाक विभागास त्यांची माहिती रीतसर दिली. नांदेडचे यशस्वी डाक अधिक्षक राजीव पालेकर यांनी कै. सटवाजी टारके यांचे वारस कविता सटवाजी टारके यांच्या मार्फत प्रल्हाद घोरबंड यांना डाक अधिक्षक दालनात राजीव व्ही पालेकर यांच्या हस्ते दहा लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना प्रल्हाद घोरबंड म्हणाले की, कै.सरवाजी टारके कुटुंबातील सदस्य मोठ्या दुःखात असताना डाक अधीक्षक नांदेड यांनी विना विलंब अपघाती विम्याची रक्कम दहा लाख रुपये मिळून देऊन टारके कुटूंबियांना मोठा आधार दिला याबदल त्यांनी आभार मानले.
यावेळी डाक अधीक्षक मार्गदर्शन करताना म्हणाले की* अशी वेळ प्रत्येकाच्या नशिबी न सांगता येत असते. प्रत्येक नागरिकांनी आपल्या गावात वाड्या तांड्यात पोस्टमन मार्फत या योजनेचा वार्षिक लाभ फक्त ३९९रुपये भरून घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमाला पोस्ट बँकेचे शाखा अधिकारी ज्ञानेश्वर नटवे, प्रगत वानखेडे, सहायक डाक अधिक्षक श्री.योगेश काटोले,डाक साहयक पी.के.पवार,डाक कर्मचारी उपस्थित होते.
