नवीन नांदेड| भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिडको हडको येथे भारतीय बौध्द महासभा दक्षिण नांदेड व नंदीग्राम बुध्द विहार व्यवस्थापन समिती सिडको नांदेड व वंचित बहुजन आघाडी दक्षिण सिडको नांदेड च्या वतीने पणती ज्योत अभिवादन रॅलीस समाज बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. ६ डिसेंबर २०२३ रोज बुधवार, या दिवशी सायंकाळी काढण्यात आलेल्या सिडको, हडको या शहरातील प्रमुख रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भव्य दिव्य अशा पणती ज्योत अभिवादन शांतता रॅलीचे दिप प्रजवलन भारतीय बौद्ध महासभा दक्षिण अध्यक्ष पि. एम. वाघमारे,पि.एस.गवळे,माजी नगरसेवीका चित्रा गायकवाड, डाॅ. करूणा जमदाडे,यांचा हस्ते करण्यात आले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या रॅलीमध्ये सिडको,हडको या परीसरातील सर्व बौध्द उपासक, उपासिका ,युवक युवती,लहान मुले यांनी सहभाग नोंदवला.
हि पणती ज्योत अभिवादन रॅली नंदी ग्राम बौद्ध विहार संभाजी चौक मार्ग नंदिग्राम बुध्द विहार संभाजी चौक सुरुवात होऊन संभाजी चौक ते इंदिरा गांधी कॉलेज, विद्यादान कोचिंग क्लासेस, पंचशील बुध्द विहार, हडको येथून पंचशील चौक ज्ञानेश्वरनगर मार्गे मुख्य रस्त्याने अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौक सिडको पासून ते डॉ.रायेवार यांच्या दवाखाना ते शिवमंदिर रोड कुसूमताई शाळा ते १२० रोड गुरूवार बाजार जेतवन बुध्द विहार मैदान येथे त्रिशरण पंचशील ग्रहण करून व अभिवादन सभेने समारोप करण्यात आला. टि.एन.वडगावकर, भिमराव बेरजे, भिमराव जमदाडे, अशोक मगरे, विठ्ठल गायकवाड, राजुभाऊ लांडगे, अनिल बेरजे, दिलीप हानमंते, सिध्दार्थ गायकवाड, बि.डी कांबळे, नरसिंग दरबारे, साहेबराव भंडारे, अमृत नरंगलकर,संजय भुरे,रितेश बेरजे, प्रा.नंदकुमार गच्चे, प्रसेनजित वाघमारे,यांच्या सह समाज बांधव,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.