
नांदेड| नांदेड येथील जलतरणपटू कौशल्य शिकून सागर तरतील आणि अध्यात्म स्वीकारून भवसागर तरतील असे प्रतिपादन श्री बापू किनगावकर यांनी केले. ते नांदेड येथे आयोजित शेषराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित जलतरण स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील ज्येष्ठ विधी तज्ञ श्री डी जी पवार हे होते . तर यावेळी निवृत्त अधिकारी बी पी नरोड, नायब तहसीलदार श्री विजय येरावाड , विस्तार अधिकारी एस जी पठाण, गुरुदीपसिंग पुजारी, सह शिक्षक आनंद शर्मा, ज्येष्ठ प्रशिक्षक राजेश सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पोहणे आणि इतरांना मदत करणे याबाबी कै. शेषराव मुंडकर यांनी जपल्या. त्या चांगल्याबाबी पुढील पिढीला कळल्या पाहिजेत. त्यांच्या चांगल्या गुणांच अनुकरण केलं पाहिजे. बापू पुढे म्हणाले की, येथील जलतरणाचे कौशल्य शिकून जलतरणपटू सागर तरतील आणि अध्यात्म्याच्या साह्याने भवसागरही तरतील. यावेळी निवृत्त कोषागार अधिकारी श्रीमान नरोड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोप डी जी पवार यांनी केले. यावेळी कैलास वाशी शेषराव बसवंतराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ६० वी सागरी जलतरण स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली यासाठी त्यांची निवड झाली.
त्यामुळे अजिंक्य नरवाडे,ऋषिकेश बेंबडे,आदित्य राजुरे,संकेत तोटावाड,अविष वाघमारे, विणेश कोरुळे, मल्हार कदम. या जलतरणपटूचे पुष्पगुच्छ देऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जलतरणपटू यांना योग्य कौशल्य आणि प्रशिक्षण देणारे राजेश सोनकांबळे आणि मयूर केंद्रे यांचा विशेष गौरव करण्यात आला.यावेळी पालक प्रतिनिधी या नात्याने नरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार बसवंत मुंडकर यांनी व्यक्त केले. यावेळी साईनाथ उत्तम बरगे आणि प्रसाद देशपांडे यांनी विशेष परिश्रम केले.
