नांदेडमहाराष्ट्र

खाजगीकरण,कंत्राटीकरण, बेरोजगारीकरणा विरोधात संयुक्त कृती समितीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड| राज्य सरकारने जनविरोधी निर्णय घेत, चुकीची धोरणे राबविण्याचा सपाटा लावला असून त्या विरोधात दि.२९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयटीआय कॉर्नर महात्मा फुले पुतळा येथून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खाजगीकरण, कंत्राटीकरण, बेरोजगारीकरण विरोधी संयुक्त कृती समिती,नांदेड जिल्हा च्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दि.६ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी पद्धतीने ८५ संवर्गातील १३८ उपसंवर्गातील कर्मचारी भरती करण्याचा निर्णय तसेच दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील ६५ हजार शाळा दत्तक शाळा योजने अंतर्गत खाजगीकरण करणे आणि दि.२१सप्टेंबर २०२३ च्या पत्रानुसार राज्यातील १४७८३ शाळा बंद करून समूह शाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णया विरोधात राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून आक्रमकपणे मोर्चे आंदोलने काढण्यात येत आहेत.

एकीकडे देशातील राष्ट्रीय सार्वजनिक मालमता व संपतीची विक्री बड्या भांडवलदारांना केली जात असून, नोकर भर्ती बंद करण्यात आली आहे. शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात कंत्राटीकरण केल्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळणे देखील कठीण झाले आहे. या मोर्चा मध्ये एकूण बारा मागण्या करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.

प्रमुख मागण्यामध्ये सहा सप्टेंबरचा शासन निर्णय आणि आठरा सप्टेंबरचे खाजगीकरण करण्यासंदर्भातील आणि एकवीस सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त पुणे यांनी काढलेले पत्र रद्द करण्यात यावे.जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील तीन लाख रिक्त पदांची भरती तात्काळ करावी.राज्यातील सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून करण्यात यावी. मध्यप्रदेश सरकारच्या धरतीवर विविध स्पर्धा परीक्षांची फीस एकच आकारण्यात यावी. स्वामीनाथन आयोगाच्या सीफारशीची अंमलबजावणी करावी.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व निर्देशानुसार कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. सारथी, महाज्योती,बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. आदी मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.

संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्या शिष्टमंडळात खाजगीकरण, कंत्राटीकरण,बेरोजगारीकरण संयुक्त कृती समितीचे निमंत्रक सूर्यकांत विश्वासराव यांच्यासह समन्वयक संजय शिप्परकर,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड, प्रा.देविदास इंगळे,विलासराव पतंगे, विठ्ठल चव्हाण सर आदींची उपस्थिती होती.यावेळी निमंत्रक आणि समन्वयकांची थोडक्यात भाषणे झाली.

आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सूर्यकांत विश्वासराव,प्रकाश फाजगे,प्रा. बालाजी कोम्पलवार,अशोक मोरे, कॉ.विजय गाभने, कॉ.विनोद गोविंदवार, कॉ.मंजूश्री कबाडे, शंकरराव डक,विशवनाथ चांदलवाड, विलासराव पतंगे,कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, सतीश देशमुख,कॉ.करवंदा गायकवाड, मोहन फाजगे,राम एडके, प्रा.मुकुंद बोकारे,कॉ.लता गायकवाड,सौ.झकास फाजगे,सौ. स्वाती कोठूडे,अवधूत क्षीरसागर,कॉ. दिगंबर घायाळे,अक्षय गायकवाड आदींनी केले. मोर्चा मध्ये बहुतांश शिक्षक संघटना सामील झाल्या होत्या.केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली. जिल्हा पोलीस दला मार्फत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे संयुक्त कृती समितीचे समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!