हिमायतनगर| गेल्या अनेक वर्षा पासून ग्राम पातळीवरील ग्रामपंचायत मध्ये सांगून घेण्यासाठी सुध्दा धाडस होत नाही अशा तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या संगणक परिचालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने परिचालक वैतागलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहेत.हिमायतनगर तालुक्यातील परिचालकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून दि.10 नोव्हेंबर पासून गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन हे आंदोलन सुरू केले आहे. सध्या ग्राम पंचायत मध्ये साधे रहिवासी प्रमाण पत्र पाहिजे असल्यास सुध्दा संगणकाचा वापर होत आहे अशावेळी याचा फटका गावकऱ्यांना बसणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्प सीएससी २.० संगणक परिचलकांच्या अथक परीश्रमाने नावारुपास येऊन सुद्धा राज्यातील संगणक परिचालक यांच्या मागण्याकडे शासन जाणीव पूर्वक करीत आहे. तूटपुंजे मानधन देऊन अनेक कामांचे टार्गे ट दिले जात आहे, कमी म निधनात शासनाचे अनेक कामे करून सुद्धा मानधन वेळेवर वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे, आकृती बंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे, नियमबाह्य कामे लावताना संदर्भीय पत्रान्वये ग्राम विकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा.
सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावे, येत्या दिवाळी सणापूर्वी आकृतीबंधात ागील दोन महिन्याचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भव्य विराट मोर्चा व धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना हिमायतनगर तर्फे मागण्याचे निवेदन आपले सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक नितीन मेहत्रे यांच्या कडे निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष रमेश सर्पे, उपाध्यक्ष मारोती गाडेकर, सचिव नागसेन गोखले,विशाखा भरणे, ज्ञानेश्वर माने,नितेश कोरपकवाड, सतीश वाडेकर, यांच्यासह संगणक परिचालक उपस्थित होते.