
हिमायतनगर । तालुक्यातील मौजे सोनारी फाट्या जवळ दुचाकीने पायी चालणार्या एका युवकास पाठीमागून जोराची धडक दिल्याने २४ वर्षीय युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना गुरुवार ता. १८ रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी मयताचा भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भोकर नॅशनल हायवे वर सोनारी फाट्यावरून २४ वर्षीय युवक संभाजी भारत कसबे रा. सोनारी हे गावाकडं जात होते. दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात दुचाकी क्रमांक ( स्कूटी ) एम. एच. २६ सी. के. ५९८१ ने येवून त्यास जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत संभाजी भारत कसबे वय २४ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरे अशोक राहूल नेवरकर हे जखमी झाले आहेत. ते या घटनेचे साक्षीदार आहेत.
मयताचे भाऊ प्रशांत भारत कसबे वय २९ रा. सोनारी ता. हिमायतनगर यांचे फिर्यादीवरून जबर धडक देणारे दुचाकीस्वार बालाजी शंकर जाधव यांचे विरूद्ध आपल्या हातातील वाहन निष्काळजी पणे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कलम ३०४, २७९, ३३७,३३८, भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कदम ह्या करीत आहेत.
